नवी दिल्ली – बॅंकिग फसवणूक आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायबर चोरटे तुमच्या बॅंक अकाउंटवर नजर ठेऊन असतात. अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत की, त्यांचे संपूर्ण खाते रिकामे झाले आहे आणि त्यांना या गोष्टीची माहिती देखील नाही.
अनेक प्रकारे बॅंकिंग फसवणूक केली जाते. तुम्ही बॅंकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून देखील तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की बॅंक खातं उघडताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक बॅंकेत दिलेला आहे तो क्रमांक जर तुम्ही वापरत नसाल तर तात्काळ बदलून चालू क्रमांक बॅंकेशी जोडा. पैसे काढल्यानंतर आणि भरल्यानंतर बॅंक आपल्या खातेदारांना मेसेज पाठवत असते.
घरबसल्या कसा बदलता येईल मोबाईल नंबर –
– सर्वात आधी बॅंकेच्या नेट बॅंकिंग वेबसाइटवर जाऊन लाॅग इन करा.
– लाॅग इन केल्यानंतर प्रोफाइल वर क्लिक करा.
– त्यानंतर पर्सनल डिटेल वर क्लिक करून तुम्हाला बॅंक प्रोफाइल पासवर्ड टाकावा लागेल.
– सबमिट केल्यानंतर जुने प्रोफाइल आणि नंबर दिसेल. तेथून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता.
जर तुम्ही इंटरनेट बॅंकिंगचा वापर करत नसाल तर बॅंकेत जाऊन मोबाईल नंबर बदलू शकता. तुम्हाला तुमच्या बॅंक शाखेत जाऊन मोबाइल नंबर बदलण्यासाठीचा फाॅर्म भरावा लागेल. यासाठी तुम्हाला तुमचे पासबुक आणि आधार कार्डची झेराॅक्स काॅपी द्यावी लागेल. ही प्रोसेस केल्यानंतर बॅंक तुमचा मोबाइल नंबर बदलेल.