-->

टीम इंडियाच्या विजयावर अजित पवारांची खास प्रतिक्रिया…..

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खास ट्विट

ब्रिस्बेन – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने तीन गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर मालिका ( BorderGavaskarTrophy ) जिंकून इतिहास घडवला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून,  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुध्दा ट्विट करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारतीय क्रिकेट संघानं मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या यशस्वी नेतृत्वाखाली लढाऊ वृत्तीनं खेळून; ऑस्ट्रेलियातील मैदानावर यजमान संघाचा पराभव करुन मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन! विजयाची ही घोडदौड अशीच सुरु राहो, या शुभेच्छा!

या आधी भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.