भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि नवीन इतिहास रचला गेला. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या जमिनीवर उतरला. प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावरील विविध माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरतानाचा व्हिडीओ लँडरच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. इस्रोने हा खास व्हिडीओ ट्वीट करत शेअर केला आहे.