पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करुन भारताने मोठा विक्रम केला होता. आज सकाळी पंतप्रधान मोदी ग्रीसवरुन थेट बंगळुरूमध्ये असलेल्या इस्रोच्या मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना PM मोदी अतिशय भावनिक देखील झाले होते. तसंच, पंतप्रधानांनी यावेळी काही मोठ्या घोषणाही केल्या.