Happy Birthday Sonu Sood : देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुदकडे किती आहे संपत्ती?

मुंबई –  करोनाच्या महामारीने देश पूर्णपणे पोखरून काढला. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. देशात प्रचंड वेगाने होत असलेल्या संसर्ग आणि अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, यामुळे देशात अनेक करोनाबाधितांचे प्राण जात आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यूंची नोंद होत आहे. त्यातच गेल्या २४ तासात देशात करोनाबळींची संख्या नकोशा उच्चांकावर पोहलची आहे.

या महामारीच्या काळात देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुद ही ओळख देशात निर्माण करणारे सोनू सुद यांनी  करोनाच्या काळात अनेक गरजुंना मदत केली आहे. त्यामुळे  सोनू सूदचे काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी करतोय.

त्यांनी केलेल्या मदतवरून सध्या त्यांचा कडे संपत्ती किती आहे यावर सोशलवर जोरदार चर्चा होत आहे.  तर काहींना त्याचा ऐकून संपत्ती बदल जाणून घेण्यास उत्सुकता आहे. यातच ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूदची एकूण संपत्ती १३०.३३९ कोटी रुपये इतकी आहे.  सोनूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सोनूला गाड्यांची आवड आहे. सोनूकडे ऑडी क्यू 7, मर्सिडीज बेंझ एमएल क्लास आणि पोर्शे पानामेरा आहे. 

दरम्यान, सोनू सूदने करिअरच्या सुरुवातीला जरी  व्हिलनचा रोल असला तरी आता मात्र तो व्हिलनचा रोल करणार नाही आहे.  तेलगू फिल्म ‘अल्लूदू अधूर’मध्येही तो व्हिलनचा रोल करतो होता. मात्र त्याच्या या निर्णयाला अनुसरून निर्मात्यांनी सिनेमात त्याच्या रोलमध्ये बदल केला आहे. अनेक सीन नव्याने लिहीले गेले आणि त्यांचे शूटिंग देखील नव्याने होणार आहे. 

आता सकारात्मक रोलच करायचे असे सोनूने ठरवले असल्याने यापुढच्या काळात त्याच्या सिनेमांची निवडही त्याच निकषांच्या आधारे होणार आहे. आता वर्षातून किमान दोन सिनेमेच करायचे असे त्याने ठरवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.