“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद मिळालं”

रावसाहेब दानवे यांचा भागवत कराड, कपिल पाटील यांना टोला

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. या विस्तारात महाराष्ट्रातून राज्यातील चार नव्या मंत्र्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा सत्कार करण्यासाठी दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  रावसाहेब दानवे यांनी  यावेळी भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला.

“आपण केंद्रात मंत्री झालात. आता हा अनुभव वेगळाच आहे. आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली. मला ४२ वर्ष लागली पण तुम्ही सहा महिन्यात काम केले. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम मंत्रिमंडळात कराल,” असे रावसाहेब दानवे भागवत कराडांचा उल्लेख करत म्हणाले.

“कपिल पाटीलदेखील मी नवीन आहे म्हणाले. तुम्ही सात वर्षात राज्यमंत्री झालात हे पण काही कमी नाही. मला ४२ वर्ष लागली. तुमच्यासारखे नशीबवान लोक सापडणं कठीण आहे,” असा मिश्कील टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी आपली दिल्लीत येण्याची इच्छा नव्हती, अपघाताने आलो असं सांगितलं. “दिल्लीमध्ये मी अपघाताने आलो. मी येण्यासाठी तयार नव्हतो. जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी संस्कृती. मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी इतिहास हा एकदम वेगळा आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण मराठी सारस्वाताचा आणि महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, असे नितीन गडकरींनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.