मुंबई – करोना व्हायरसमुळे लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवर जुन्या मालिकांचे पुर्नप्रसारण करण्यात आले. यात “रामायण’ या धार्मिक मालिकेने पुन्हा आपली क्रेझ कायम असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच सोशल मीडियावरही लोक “रामायण’ पाहिल्यानंतर त्यांचे जुने दिवस आठवत आहेत. याशिवाय “रामायण’ संबंधित अनेक जुन्या कथाही खूप व्हायरल होत आहेत.
अशातच, अभिनेत्री दीपिका चिखलिया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांनी फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट लिहिली असून ‘रिअल लाइफमधल्या रामाशी’ भेट कशी झाली, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
दीपिका म्हणते , रामायणात सीतेची रामाशी भेट कशी झाली हे सर्वांनाच ठाऊक आहे.मात्र माझ्या खऱ्या आयुष्यात मी माझ्या रामाला कशी भेटली ते आज तुम्हाला सांगणार आहे.१९६१ पासून माझ्या पतीचे कुटुंबीय पारंपरिक भारतीय सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन व विक्री करत आहे. ‘शिंगार’ असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. ‘सुन मेरी लैला’ या माझ्या पहिल्यावहिल्या चित्रपटात मी एका जाहिरातीसाठी मॉडेलिंग करताना दिसते. ती जाहिरात शिंगार काजळची होती. या जाहिरातीचं शूटिंग बघण्यासाठी हेमंत सेटवर आले होते. तेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर आम्ही आपापल्या आयुष्यातील कामात व्यस्त झालो पण दोघांची पुन्हा भेट होईपर्यंत पहिल्या भेटीचा विचार मनातून जात नव्हता. य नंतरहेमंत टोपीवाला यांच्याशी १९९१ मध्ये लग्न केलं. हेमंत आणि दीपिकाच्या लग्नात बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांनीदेखील हजेरी लावली होती.