सांगली – नेर्ली (ता. कडेगाव) येथील ५७ वर्षीय पुरुष करोनाबाधिताचा मृत्यू झाला. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते . तसेच त्यांना मधुमेह होता. ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे . जिल्ह्यात आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.