गृहिणींनो, चटकदार लोणच्याची करा तयारी

मार्केट यार्डात कैऱ्यांची आवक सुरू : भावही आवाक्‍यात


पहिल्या पावसानंतर कैऱ्या खरेदीचा “ट्रेंड’ कायम

पुणे – कैऱ्या म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा कैऱ्यांपासून संपूर्ण देशात बनविला जाणारा पदार्थ म्हणजे लोणचं. घरगुती लोणचं करून त्याचा साधारण वर्षभर आस्वाद घेण्याची परंपरा आजही कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डातील तरकारी विभागात लोणच्याच्या गावरान आणि खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तोतापुरी कैऱ्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या पावसानंतर लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या खरेदीचा “ट्रेंड’ आहे. तो आजही कायम आहे. त्यामुळे कैऱ्यांची आवक होऊनही अद्याप अपेक्षित मागणी नसल्याचे दिसून येत आहे.

येथील बाजारात जिल्ह्यासह रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातूनही कैऱ्यांची आवक होत आहे. सध्या बाजारात दररोज 7 ते 8 टेम्पो कैरी दाखल होत आहे. गावरान कैरीच्या एका किलोस 10 ते 25 रुपये, तर तोतापुरी कैरीची 12 ते 16 रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत आहे. लोणच्यासाठी गावरान कैरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तर तोतापुरी कैरी तिखट मीठ लावून खाणे नागरिक पसंत करतात. त्यामुळे सध्या बाजारात तोतापुरीला चांगली मागणी आहे.

गेल्या काही वर्षांपासून लोणचे व्यावसायिकांकडून थेट कोकणातील बागेतूनच कैऱ्यांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातून मार्केट यार्डात होणारी कैरीची आवक बंद झाली. बाजारात एकूण उत्पादनाच्या 25 टक्केच आवक बाजारात होत आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर घरगुती ग्राहकांकडून लोणच्यासाठी कैरीला मागणी वाढेल. यावेळी आवकही चांगल्या प्रमाणात होईल.
– विलास भुजबळ, व्यापारी तथा अध्यक्ष, छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)