सुषमा स्वराज यांनी किर्गिजच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

बिश्केक – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बिश्केकमध्ये होणाऱ्या शांघाई सहकार संघटनेच्या परराष्ट्र मंत्रांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी सुषमा स्वराज यांनी किर्गिजचे राष्ट्राध्यक्ष सूओनबे जेनिबॉव्ह यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये दहशतवाद्याचा मुद्याबरोबरच विभिन्न मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा क्षेत्रात एकमेकांसोबत सहयोग वाढविण्याची चर्चा झाली.

काही दिवसांपूर्वी, सुषमा स्वराज यांनी कझाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कैरात अब्द्राखमानोव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी व्यवसाय, ऊर्जा, रक्षा आणि सुरक्षा क्षेत्रात एकमेकांसोबत सहयोग वाढविण्यची चर्चा केली.

तत्पूर्वी, शांघाई सहकार संघटनेची स्थापना 2001 साली शांघाई शहरात शिखर संमेलनात झाली असून रूस, चीन, किर्गिज गणराज्य, कझाकिस्तान, ताजिकिस्तान और उजबेकिस्तान या देशातील राष्ट्रपतींच्या उपस्थित करण्यात आहे होती. भारत 2017 साली या समूहातील पूर्ण वेळ सदस्य बनला होता. तेव्हापासून भारत एससीओ तसेच दहशतवादाचा विरोधात सुरक्षा संबधित सहयोगाला मजबूत करण्यासाठी पुढे येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.