मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच सोशलवर ऍक्टिव्ह असते. ती सोशलवर फोटो आणि अनेक ट्रेंडिंग मुद्यावर आपलं मत मांडत असते. नुकतेच तिने पावरी या ट्रेडिंग हॅशटॅगवर व्हिडियो शेअर केला होता.
View this post on Instagram
यामध्ये तिने आणि राजने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो, ‘ये हमारा ब्रेकफास्ट है, ये हमारा व्यू है, और ये हमारी पार्टी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत ‘पावरी हो रही है’ असे कॅप्शन दिले आहे. राज आणि शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
यानंतर पुन्हा एकदा शिल्पाने बिकनी फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती मालदिवच्या समुद्र किनारी हॉलिडे एन्जॉय करतांना दिसत आहे. या व्हिडियोत ती ब्लँक रंगाच्या बिकनीत समुद्र किनारी रॅम्प वॉक करतांना दिसत आहे.
View this post on Instagram
तिच्या या फोटोशूटला काहीच मिनिटात १.४ मिलियन लाईक मिळाले आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर कॉमेन्टचा पाऊस पडला आहे. दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शिल्पा शेट्टी लवकरच मोठ्या पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. ती “निकम्मा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या तिच्यासोबत अभिमन्यू दासानी काम करत आहे.