असा द्या, व्हिडीओ मीटिंगसाठी स्वतःला सेलिब्रिटी लुक

पुणे- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आपल्या घरात असून, वर्क फ्रॉम होम आणि घरातील इतर कामे करताना दिसत आहेत.

दरम्यान, वर्क फ्रॉम होम असलं तरी ऑफिसचा व्हिडीओ कॉल किंवा मीटिंगला हजेरी लावताना व्यवस्थित पेहराव करणं आवश्यक असतं. त्यामुळे घरीच आहोत म्हणून काहीही घातलं तर चालतं हा विचार बाजूला ठेवा आणि आपल्या वॉर्डरोबमध्ये उपलब्ध असलेल्या कपड्यांचा वापर करुन ऑफिसच्या मिटिंगसाठी व्यवस्थित पेहराव करा.

सुती कपडे : तुम्ही लॉकडाउनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सुती ड्रेस घालू शकता. याचे दोन फायदे आहेत, एक म्हणजे सुती कपडे लवकर वाळतात आणि शरीराभोवती हवा खेळती राहते.

सुती कुर्त्यामध्ये अधिक खुलून दिसण्यासाठी अॅक्सेसरीजचा वापर करू शकता. फार अॅक्सेसरीज वापरण्याची गरज नाही. छोटासा झुमका छान दिसेल. तसेच, काजळ लावल्यामुळे पेहरावाची शोभा अधिक वाढेल. साजेसा आणि मनाला उभारी देणारा पेहराव केलात तर काम करताना मूड फ्रेश राहील.

पलाझो : फॅशनेबल आणि वावरण्यास सुटसुटीत असे कपडे घालणं गरजेचं आहे. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ‘पलाझो’. त्याच्या जोडीला सुती कुर्ते, क्रॉप टॉप, लाँग कुर्ता, टँक टॉपचा वापरू शकता. अशा प्रकारे तुमच्या पेहरावात बदल होईल आणि नेहमीपेक्षा वेगळी फॅशन करुन बघितल्याचं समाधानही मिळेल.

दरम्यान, पलाझोसोबत विविध रंगाचे प्लेन किंवा रेषा-रेषा असलेले शर्ट परिधान करा, जेणेकरुन काम करताना पेहरावाचा त्रास होणार नाही.

टी-शर्ट ड्रेस : घरी वापरण्यास सुटसुटीत आणि ट्रेंडी वाटणारे टी-शर्ट ड्रेसचा उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे. असा पेहराव केलात तर कामात सकारात्मकता राहील. घरी काम करताना व्हिडीओ कॉल किंवा सामान आणायला जाण्यासाठी टी-शर्ट ड्रेसचा वापर नक्की करू शकता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.