मेष : हातातील कामे वेळेत पूर्ण करा. नवीन कामांकडे लक्ष द्या.
वृषभ : अतिविचाराने प्रकृती बिघडण्याची शक्यता.
मिथुन : सर्वांशी सलोखा ठेवा, वाद टाळा.
कर्क : वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह : सर्वांसमवेत हौसमौज कराल, आनंदी दिवस.
कन्या : घरात समाधानकारक तोडगा निघाल्याने बरे वाटेल.
तूळ : शुभकार्य ठरतील, मुलांची अपेक्षित प्रगती कळेल.
वृश्चिक : विद्यार्थ्यांना लाभदायक ग्रहमान आहे.
धनु : सामाजिक कार्य व आवडत्या छंदात मन रमवाल.
मकर : महिलांचा वेळ सत्कारणी लागेल, समाधान लाभेल.
कुंभ : प्रसंगावधान बाळगा, कामाचा उरक पडेल.
मीन : मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल.