आजचे भविष्य (गुरुवार, दि.१९ नोव्हेंबर २०२०)

मेष : विद्यार्थ्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. घरात कामाचा पसारा वाढवू नका.

वृषभ : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांकडे लक्ष द्याल.

मिथुन : विद्यार्थ्यांना एकाग्रता साधता येईल. विद्यार्थ्यांनी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये.

कर्क : तरुणांनी अतिधाडस करू नये. केलेली कामे कौतुकांस पात्र ठरतील.

सिंह : कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.

कन्या : चांगल्या घडामोडी घडतील. कामात प्रगती चांगली होईल. कामाचा उरक दांडगा राहील.

तूळ : हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्या. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.

वृश्‍चिक : मानलं तर समाधान मिळेल. व्यवसायात लांबलेली कामे मार्गी लागतील. पैशाची चणचण दूर होईल.

धनु : व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी येणीही वसूल होतील. नवीन कामे मिळतील.

मकर : मुलांच्यासाठी पैसे खर्च कराल. समाधान राहील. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात यश येईल.

कुंभ : नोकरीत कोणत्याही कामात बेफिकीर राहू नका. महिलांना अपेक्षित कामांना चालना मिळेल.

मीन : चिकाटी, जिद्द यांचे जोरावर कामे मिळतील. स्वप्ने साकार होतील. निर्णय अचूक ठरतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.