नगर – महापौर बाबासाहेब वाकळे यांना आज वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने करोना योद्धा म्हणून गौरवविण्यात आले. संस्थेतर्फे वाकळे यांना सन्मानपत्र देण्यात आले.
विरोधी पक्षनेते संपतराव बारस्कर, अनिकेत आवारे, प्रवीण थोरात, संकेत नरसाळे, सचिन रेडे, सरपंच दीपक गांगर्डे, उद्योजक आशिष पोखरणा, किशोर कानडे, नीलेश जाधव, शुभम वाकळे आदी यावेळी उपस्थित होते.
वर्ल्ड मराठाचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर संघटनेने समाजातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महापौर वाकळे यांनी कोविड-19 या महाभयंकर साथीच्या काळाते नगरमध्ये महापालिकेलच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यातील आलेल्या कोव्हीड रुग्णांची काळजी घेण्याचे काम केले, अशी भूमिका पिसाळ यांनी व्यक्त केली.
कोविड-19 च्या अटीतटीच्या काळात आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून, सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले. त्याबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी हे सन्मानपत्र समर्पित करीत आहोत, असे अनिकेत आवारे यांनी यावेळी सांगितले.