एच -1 बी व्हिसावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल
नवी दिल्ली : अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसाधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कारण एच -1बी व्हिसावरील निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने एच -1बी व्हिसाधारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता.
United States government announces relaxations in some rules for H-1B visas. pic.twitter.com/fU4ff6rsJg
— ANI (@ANI) August 12, 2020
लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी एच -1बी व्हिसाधारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना H-1B व्हिसाधारकाच्या पत्नीलाही अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली आहे. एच -1बी व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल. एच -1 बी हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या एच -1बी सह वेगवेगळ्या व्हिसांवर बंदी आणली होती. या व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या संकटात येतात असा ट्रम्प यांचा दावा आहे. करोनामुळे अमेरिकेत लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात तिथल्या लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळ्या व्हिसावर बंदी आणली होती. पण आता त्यांनी एच -1बी व्हिसाधारकांना दिलासा दिला आहे.