हॉंगकॉंग ; हॉंगकॉंगमधील लोकशाही चळवळीत जवळपास पाच महिन्यांनंतर काही तरी कमी पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. हजारो निदर्शकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली. तर हॉंगकॉंग पोलिसांनी निदर्शकांवर अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. निदर्शकांनीही पोलिसांवर गॅसबॉम्ब फेकले.
कोझवे बे शॉपिंग आणि जवळच्या व्हिक्टोरिया पार्कमधील रस्त्यावर अश्रुधुराचे ढग दाटले होते. बीजिंगने चीनच्या भूभागावर आपली पकड आणखी घट्ट करण्याचे संकेत दिल्यानंतर अर्थपूर्ण स्वायत्ततेची मागणी करणारे मोर्चे पुन्हा काढले गेल्यावर दंगल नियंत्रक पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. निदर्शकांवर पाण्याचा मारा करण्यासाठी पोलिसांनी किमान दोन वॉटर कॅनन ट्रक या परिसरात तैनात केले. अनधिकृत रॅली आणि फेस मास्कवरील सरकारी बंदीचे उल्लंघन केल्याचा इशारा त्यांनी आंदोलकांना दिला होता.
शहरातील शेजारच्या वान चाई भागातील सिन्हुआच्या कार्यालयात काही आंदोलनकर्ते घुसले. त्यांनी काचेच्या दरवाजाचे प्रवेशद्वार आणि खिडक्या फोडून, लाल शाईने घोषणा रंगवल्या आणि भित्तिचित्रांवर फवारणी केली. अंदोलकांनी कार्यालयाच्या लॉबीमध्ये आगही लावली.
चिनी बॅंका आणि चीनशी जोडलेल्या व्यवसायांना निदर्शकांकडून वारंवार लक्ष्य केले जात आहे. शनिवारी काही निदर्शकांनी फुटबॉल मैदानाचे उद्यानाचे प्रवेशद्वार, मेटल रेलिंग, गोल पोस्ट उखडून टाकले. पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. पण आंदोलकांनी पोलिसावर गॅसोलईन बॉम्ब फेकले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हजारो लोक शहरातील सार्वजनिक चौकात जमले आणि रस्त्यांवर अशाप्रकारे संघर्ष सुरू होता.