प्रामाणिक करदात्यांचा होणार सन्मान

गुरुवारपासून नवीन व्यासपीठ,पंतप्रधान मोदी करणार उद्‌घाटन 

नवी दिल्ली – देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यासाठी गुरुवारपासून एक स्वतंत्र व्यासपीठ तयार केले जाणार असून पंतप्रधान मोदी त्याचे उद्‌घाटन करणार आहेत.

चालू वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना त्याची घोषणा करण्यात आली होती. याद्वारे प्रत्यक्ष करातील सुधारणांनाही चालना दिली जाणार आहे, असे अर्थमंत्रालयाने या संबंधात जारी केलेल्या एका निवेदनात नमूद केले आहे.

या सुधारणांचे मुख्य उद्दिष्ट करांच्या दरात कपात करणे आणि प्रत्यक्ष करविषयक कायदे अधिक सुलभ करणे हे आहे. करदात्यांची छळवणूक होऊ नये आणि करदाते आणि प्रशासन यांच्यात विश्‍वासार्ह वातावरण निर्माण व्हावे तसेच एकूणच करपद्धतीविषयी पारदर्शकता असावी, असा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.