नागरीकत्वाच्या विषयावर खुलासा करा राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली – नागरीकत्वाच्या विषयावर येत्या पंधरा दिवसात वस्तुस्थिती स्पष्ट करा अशी मागणी करणारी नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयाने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे असे गृहमंत्रालयातून सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी सन 2003 साली ब्रिटन मध्ये बॅकोप्स लिमीटेड नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. त्या कंपनीचे राहुल गांधी हे संचालक आणि सेक्रेटरी होते. कंपनी रजिस्टर करताना राहुल गांधी हे ब्रिटीश नागरीक असल्याचा उल्लेख त्यावेळी करण्यात आला होता. आता ही कंपनी अस्तित्वात नाही.

कंपनीच्या विवरणपत्रातही राहुल गांधी यांचा उल्लेख ब्रिटीश नागरीक असा करण्यात आला आहे असे स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्या आधारावर वस्तुस्थिती स्पष्ट करा अशी नोटीस राहुल गांधींना बजावण्यात आली आहे. त्यावर पंधरा दिवसात त्यांनी उत्तर मागवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.