सविताताई रणदिवे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची श्रद्धांजली

मुंबई : श्रीमती सविताजी दिनू रणदिवे यांच्या निधनाचे वृत्त समजून अत्यंत दुःख झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता सोनी-रणदिवे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी १९५६ साली शिवाजी पार्क येथे सर्व भाषिकांच्या झालेल्या परिषदेत त्या गुजराथी भाषकांच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या होत्या आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग असावा, अशी आग्रही भूमिका सविताताईंनी मांडली होती.

मी काही दिवसांपूर्वी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन उभयतांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासमवेत छान गप्पा केल्या. मला सविताताईंचे आशीर्वाद लाभले. दिनू रणदिवे सारख्या तपस्वी पत्रकारास प्रदीर्घ अशी साथ देऊन त्यांनी आपला पत्नीधर्म निभावला आणि आता त्या सोडून गेल्या याचे दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.