बारामती- बारामतीत लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच सराफाची दुकानं सुरु करण्यात आली. दुकांनात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांचं सोनं खरेदी करण्यात आलं आहे.
बारामतीत दुकानं सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल (15 मे) एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे.
दरम्यान, ऐन लग्नाच्या सिझनमध्ये लाॅकडाऊन सुरु झालं तर दुसरीकडे कोरोनाचा उद्रेक कायम आहे. लग्नाच्या पद्धती बदलून लग्न कमी माणसांच्या उपस्थितीत करावी लाागत आहे. त्याचमुळे अनेकांनी लग्नाला लागणाऱ्या पैशातून सोनं खरेदी केले असावे, असा अंदाज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी दर्शवला आहे.