जगभरात करोना व्हायरसने सध्या थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे हजारो जणांचा बळी घेतला असून दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच या व्हायरसने जखडले आहे. या व्हायरसमुळे एक प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. स्टार वॉर या चित्रपटाचे अभिनेते अँड्रू जॅक यांचे नुकतेच निधन झाले.
अभिनेता अँड्रू जॅक हे 76 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस अगोदरच ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. अभिनेता आणि डायलेक्ट कोच असलेल्या अँड्रू यांचा एजंट जिल मॅक्लिफने दिलेल्या माहितीनुसार अँड्रू यांचे मंगळवारी एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
एक अभिनेता असण्यासोबत ते डायलेक्ट कोच सुद्धा होते. जॅक यांनी स्टार वॉर सीरिजमध्ये काम केले होते. अँड्रू यांच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियामध्ये होम क्वारंटाईन असलेल्या त्यांच्या पत्नीने एक इमेशनल पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, ‘अँड्रू जॅक यांना दोन दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख झेलावे लागले नाही. त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे याचं समाधान त्यांना जातेवेळी होते.’