नवी दिल्ली : देशातील अत्यंत महत्वपूर्ण निकालापैकी एक असणारा निकाल म्हणजे अयोध्या प्रकरणाचा निकाल. याच प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
There are potential security concerns with the SC Ayodhya verdict tmrw morning. All government schools and many private schools are closed tomorrow, as it is a second Saturday. We are advising all private schools to also remain closed tmrw.
— Manish Sisodia (@msisodia) November 8, 2019
अयोध्याचा निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सर्व खासगी शाळा बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या प्रकरणावरील निर्णयाच्या दृष्टीने सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने सर्व सरकारी शाळा व काही खासगी शाळा बंद आहेत. शनिवारी सर्व खासगी शाळा बंद ठेवण्याची आम्ही शिफारस करतो.