नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी-धुळवडनिमित्त सर्व देशवासियांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून केलेल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी, रंगाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे होळी. आपल्या सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा. हा सण सर्व देशवासियांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ दे. असे म्हटले आहे.
रंग, उमंग और आनंद के त्योहार होली की आप सभी को बहुत-बहुत बधाई। यह पर्व सभी देशवासियों के जीवन में खुशियों लेकर आए। pic.twitter.com/xfrfdNaduX
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2020
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे नरेंद्र मोदी मंगळवारी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. दरवर्षी ते या कार्यक्रमात सहभागी होतात. पण कोरोना व्हायरसमुळे सार्वजनिक कार्यक्रम तूर्त टाळले पाहिजेत. त्यामुळेच आपण होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते.
दिल्लीमध्ये सध्या कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेले अनेक कार्यक्रम मंगळवारी रद्द करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून होळी-धुळवडच्या शुभेच्छा दिल्या आहेत.