टाऊन्सविले – झिम्बाब्वेने शनिवारी तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना तीन गडी राखून जिंकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायभूमीत पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय नोंदवला. ( Historic win for Zimbabwe Their first ever ODI victory against the hosts in Australia) लेगस्पिनर रायन बर्लने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत 10 धावांत पाच विकेट्स घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 141 धावांत गुंडाळला. पाच विकेट घेणारा झिम्बाब्वेचा गोलंदाज रेयान बर्ल हा सामनावीर ठरला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने 94 धावांची खेळी केली.
Historic win for Zimbabwe 🙌
Their first ever ODI victory against the hosts in Australia 👏#AUSvZIM pic.twitter.com/Z6gfI0dwSS
— ICC (@ICC) September 3, 2022
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 66 चेंडू राखून 142-7 अशी मजल मारत विजयाचे लक्ष्य गाठले. झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चकाबवाने सर्वाधिक नाबाद 37 धावा केल्या. तर तदिवानाशे मारुमणीने 35 धावा जोडून विजयात मोलाची कामगिरी बजावली.
दरम्यान, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 33 एकदिवसीय सामने झाले. यातील तीनच सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत. प्रथमच या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरविण्याचा पराक्रम केला आहे. या दोन संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडमध्ये 1983 मध्ये झाला होता. विशेष म्हणजे हा सामना झिम्बाब्वेने 12 धावांनी जिंकला होता. 2014 मध्ये हरारेमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या संघास त्यांच्याच मैदानावर हरवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
विजयानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा बसमध्ये धिंगाणा
दरम्यान, ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी बसमध्ये चांगलाच धिंगाणा घातला.
#3rdODI | Castle Corner, see what you’ve done? But who can blame us! Thanks for the support and inspiration, home or away! @CastleCornerZW #AUSvZIM | #VisitZimbabwe pic.twitter.com/Vp6VYRWSXU
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) September 3, 2022
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.