हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा सर्वदूर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात तर या ठिकाणी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी एकट्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक आवर्जून हजेरी लावतात. येथील मोदकाचं विशेष महत्त्व आहे.
विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती असल्याची नागरिकांची भावना आहे. येथील मोदकाला फार महत्त्व आहे. नवस बोलून घेतल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपापल्या परीने मोदक वाटप केले जातात. यामध्ये एखादा भाविक 11 ते असंख्य मोदक वाटप करतात. हा मोदक घेतल्यानंतर त्यांची मोठ्या मनोभावाने घरामध्ये ठेवून पूजाअर्चा केली जाते. यानंतर आपल्या मनात असलेली इच्छा पूर्ण झाल्यानंतर मोदक याठिकाणी येऊन वाटप केले जातात. त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये हा मोदक उत्सव कोणताही भाविक टाळत नाही.
महाराराष्ट्रतच नव्हे तर बाहेर राज्यातही मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील विघ्नहार्ता चिंतामणी गणपतीच्या मोदकाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा 3 लाख मोदक तयार करण्यात आले आहेत. मोदक घेण्यासाठी संपूर्ण देशातून भाविक येण्याची शक्यता आहे.
शहरातील गड्डेपिरगल्ली विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी अनंत चतूरर्दशीच्या दिवशी नवसाच्या मोदकाचे वाटप केले जाते. दर्शन व नवसाचा मोदक घेण्यासाठी देशभरातून भाविक येतात. भाविकांच्या सोयीसाठी दानशुरांसह विविध संघटनांकडून चहापाणी, नाष्टा, भोजनाची व्यवस्था केली जाते. भाविकांना रांगेत चहा, पाणी दिले जाते.
मागील वर्षात कोविडमुळे मंदिरातील दर्शन बंद असल्यामुळे भाविकांना मोदकाचा लाभ मिळाला नाही. मात्र या वर्षी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. अशी माहिती चिंतामणी गणपती मंदिरातच्या विश्वत मंडळाने दिली आहे. सुमारे ३ लाख मोदक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मोदकाच्या प्रसादाची यंदा भाविकांत उत्सुकता आहे.
महापुजेनंतर मोदक वाटप –
यंदा महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील लाखो भाविक दर्शन व मोदकासाठी येण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मोदक वाटपास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.