मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार आणि समर्थकांसह गुवाहाटीला रवाना झाले. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटाचे जणू गुवाहटीशी एक नाते जोडले गेले आहे. म्हणूनच आसाम सरकारच्यावतीने शिंदेंसह सर्व आमदारांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आसाम सरकारने विमानतळावरच रेड कार्पेट टाकल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहटी विमानतळ ते त्यांच्या हॉटेलपर्यंत जाण्याच्या मार्गावर अनेक होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या हार्डिंग्जवर हिंदुत्व की आन, महाराष्ट्र की शान अशा शब्दात मजकूर लिहिण्यात आला आहे. शंभरहुन अधिक असलेल्या या होर्डिग्जवर बाळासाहेब ठाकरेंसह आनंद दिघे यांचा देखील फोटो आहे.
विमानतळावरून हॉटेलला पोहचल्यानंतर थोडा वेळ आराम करून आज दुपारीच मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी माँ कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे समजते. त्यामुळे हॉटेलसह मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिंदे यांच्या आगमनासाठी लावलले होर्डिंग्ज आणि भगव्या झेंड्यामुळे गुवाहाटीच्या चित्रच बदलले आहे.