मुंबई – ज्या गुवाहाटीतून राज्यातील सत्तांतराची रणनिती आखली गेली त्याच गुवाहाटीत शिंदेगट पुन्हा जात आहे. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जात आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहीत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी पोस्ट लिहिली आहे की,’ हे माता कामाख्या देवी.. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी.. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये.. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये.. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये.. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी.. राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा.. अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये.. तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी.. हे अडचणींचे ‘डोंगार’ पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!’ असं लिहीत त्यांनी टीका केली आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट