मुंबई – सिंगर मिका सिंगच्या ‘स्वयंवर – मिका दी वोहती’ या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मिकाच्या स्वयंवरमध्ये एकापेक्षा एक सुंदर स्पर्धक आले आहेत. यातील काही स्पर्धक असे देखील आहेत, ज्यांचे मिकाशी चांगले संबंध आहेत. आता मिकाची राणी कोण बनेल, हे येणारा काळच सांगेल, अशातच हिना खानने या शोमध्ये एंट्री केली आहे.
View this post on Instagram
आपल्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या हिना खानने ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ या शोमध्ये प्रवेश केला. स्वयंवरमध्ये हिनाला पाहून मिका सिंगही खूप खुश दिसत होता. यावेळी हिनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक हिना खान शोच्या स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मिकाच्या स्वयंवरमध्ये आली होती.
View this post on Instagram
दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करणं गरजेचं असल्याचं हिना खानचं मत आहे. या विचाराने हिना ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ पर्यंत पोहोचली. यानंतर तिने मिकाच्या वधू बनण्यासाठी आलेल्या स्पर्धकांना ग्रूमिंगचे प्रशिक्षणही दिले. हिनाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व स्पर्धकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळाला.
View this post on Instagram
मिका त्याची वधू कोणाला बनवणार?
‘स्वयंवर – मिका दी वोटी’मध्ये मिका सिंगची अभिनेत्री मॉडेल चंद्राणी दास, मनप्रीत कौर आणि प्रणितिकासोबत चांगली बॉन्ड दिसली आहे. मिका सिंगला सर्व स्पर्धकांपैकी प्रणतिकाचा पाठिंबा सर्वात जास्त आवडतो. मिकाच्या बोलण्यातून असे दिसते की त्याला प्रणितिकासोबत पुढे जायला आवडेल, पण शोमध्ये पुढे काय होणार आहे. यावर काही सांगणे थोडे अवघड आहे.