अँटिलीया हाऊस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये असलेलया वाझेनं माफीचा साक्षीदार होण्यासाठी दर्शवलेली इच्छा ईडीने मान्य केली आहे. वाझेनी ईडीला दिलेले पत्र ईडीने मान्य केलं आहे. त्यामुळे आता वाझेंच हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाणार याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे.
100 कोटी वसूली, स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणी सध्या जेलची हवा खात असलेला वाझे हा आता माफीचा साक्षीदार बनला आहे. याआधी वाझेने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI न्यायालयात अर्ज केला होता. वाझेच्या या अर्जावर CBI ने देखील संमती दर्शवली होती. मात्र वाझेला खरंच पश्चाताप झालाय की माफीचा साक्षीदार बनून वाझे या गंभीर गुन्ह्यातून आपली सुटकेचा मार्ग काढतोय, अशी आता चर्चा सुरु झालीय.
त्यानंतर आता ईडीने वाझेचा अर्ज मान्य केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळणार असल्याचं दिसतंय.सचिन वाझे सर्व तथ्य आणि खरी माहिती सांगणार असेल तर माफीचा साक्षीदार होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर सचिन वाझे ही माहिती देऊ शकतात, असेही ईडीने म्हंटल असल्याचं समजतंय
राजकारणावर होऊ शकतो परिणाम
आगामी काळात राज्यात महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यामुळे वाझेबाबत होणारी आणखी कारवाई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणू शकते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. म्हणूनच ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.