कन्नड : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २४ विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल सात दिवस वर्गात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुत्तूर तालुक्यातील उप्पिनगडी पदवी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना हिजाब न काढता वर्गात प्रवेश नाकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आतयाचे समजते आहे.
विद्यार्थिनींना सहा दिवसांसाठी प्रवेश बंदी
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की तीन दिवसांपूर्वी, हिजाब परिधान करून उप्पिनगडी प्रथम श्रेणी महाविद्यालयात आलेल्या एका विद्यार्थिनीला सहा दिवसांसाठी शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सहा विद्यार्थिनी हिजाब घालून कॉलेजमध्ये आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप या विद्यार्थिनींवर करण्यात आला आहे. या मुली हिजाब परिधान करून वर्गात पोहोचल्या होत्या.
शाळा कॉलेजात हिजाब अनिवार्य
मंगळवारी ही घटना अशा वेळी घडली जेव्हा कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली , विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करणे बंधनकारक केले आहे. बहुतांश विद्यार्थी वर्गांना उपस्थित राहणे पसंत करत असले तरी, अल्पसंख्याक समाजातील अनेक विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्याची परवानगी असलेल्या इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून हस्तांतरण प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत.