उद्योगपती दिपक कोचर यांना हायकोर्टचा दिलासा

मुंबई : आयकर परताव्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उद्योगपती दिपक कोचर यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. सन 2012-13च्या वर्षामधील आयकर परताव्याबाबत आयकर विभागाने पाठविलेल्या नोटीसला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.

आयकर विभागाने बजावलेल्या नोटीसीविरोधात उद्योगपती दिपक कोचर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती उज्जल भूयान आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी आयकर विभागाने सुमारे रु. 394 कोटी रुपयांची रक्कम ही न्यूपॉवर रिन्यूवेबल्स प्रा. लि. कंपनीच्या समभागांवरील उत्पन्न म्हणून नमूद केले आहे. मात्र याची पूर्वकल्पना देण्यात आली नाही.

आयकर विभागाने संधीही दिली नाही अथवा संबंधित रक्कमेबाबत अधिकाऱ्यांनी संयुक्तिक कारणही दाखल केलेले नाही, असा दावा कोचर यांच्या वतीने करण्यात आला. आयकर विभागाच्या वतीने ऍड. शाम वळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका करण्याआधी कोचर यांनी प्रथम आयकर अपिलिय अधिकारीकडे दाद मागावी, असा युक्तीवाद केला. याची दखल घेत
न्यायालयाने कोचर यांना संबंधित न्यायप्राधिकरणकडे दाद मागण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली. तसेच या दरम्यान विभागाच्या नोटीसीलाही अंतरिम स्थगिती दिली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.