बंद सदनिकेत नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

उंड्री येथील घटना : शवविच्छेदानातून समजणार मृत्यूचे कारण

पुणे – एमबीए झालेल्या तरुणीचा बंद सदनिकेमध्ये नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उंड्री येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणाची नोंद कोंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल, असे पोलिसांनी सांगितले.

पूजा शेठ (34, रा. उंड्री) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती 2016 पासून उंड्री येथे रहात होती. तिने एमबीए केले असून यू.के. येथील कंपनीसाठी ऑनलाइन पद्धतीने घरुनच काम करते. तिचे मूळ गाव अहमदाबाद आहे. तिच्या वडिलांनी दि.26 जानेवारी रोजी तिच्याशी मोबाइलवर संपर्क केला होता.

दरम्यान, त्यांनी बुधवारीही तिला कॉल केला असता, ती प्रतिसाद देत नव्हती. यामुळे वडिलांनी घरमालकाला कॉल करुन माहिती दिली. घरमालक सदनिकेवर गेल्यावर दरवाजा वाजवूनही तिने दरवाजा उघडला नाही. यामुळे त्याने त्याच्याकडील चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आतून कडी लावल्याने दरवाजा उघडू शकला नाही. यामुळे घरमालकाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना बेडरुमध्ये फरशीवर ही तरुणी नग्नावस्थेत मृत आढळून आली. तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शेजारच्यांशीही नव्हता परिचय नव्हता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी रहायला आल्यापासून तिच्या घरी मित्र-मैत्रिणी कोणाचीही ये-जा दिसली नाही. ती दिवस रात्र एकटीत दरवाजा लावून घरात काम करत असायची. कधीतरी जेवण बाहेरुन मागवले जात होते. यामुळे शेजारच्यांशीही तिचा परिचय नव्हता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.