नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्लीतील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी गणवेश अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.
मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांवर कठोर टीकाही केली आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले होते की, गणवेश सक्तीमुळे चालकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी होते आणि ते त्यांच्या स्थितीचे प्रतीक म्हणूनही काम करते. तथापि शिस्तीचा भाग म्हणून गणवेश आवश्यक असल्याचे दिल्ली सरकारच्या वकिलांनी म्हटले होते. दिल्लीत सध्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर युनिफॉर्म न घातल्याबद्दल मोठ्या रकमेचा दंड केला जात आहे.
खाकी आणि राखाडी या दोन्ही रंगांच्या डझनभर प्रमुख शेड्स आहेत आणि गणवेशासाठी कोणतीही विशिष्ट छटा निर्धारित केलेली नसल्यामुळे, अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांना कोणावर खटला चालवायचा आहे याबद्दल शंका आहे. हा मुद्दाही सुनावणीच्यावेळी चर्चेत आला होता.