मुंबई : आजकाल बाईकवर बसून स्टंटबाजी करण्याचा ट्रेंडच सुरु झाला असल्याचे दिसत आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. यात एक तरुण दोन तरुणींसोबत बाइकवर जीवघेणी स्टंटबाजी करतानाचा दिसत आहे आहे. हा व्हिडीओ मिळाल्यानंतर मुंबई पोलिस आक्षण मोडमध्ये आले असून या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुबईतील हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हायरल झालेला या १३ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक तरुण दोन तरुणींना बाइकवर बसवून स्टंट करताना दिसतोय. तरुणाच्या पुढे एक आणि मागे एक अशा दोन तरुणी बसल्या आहेत आणि तो व्हीली स्टंट करतोय. या तरुणाने धावत्या बाईकचे पुढचे चाक उचलले आहे आणि एका चाकावर ही बाइक त्याने काही मीटरपर्यंत चालवली. त्याच्यासोबत दोन तरुणीदेखील आहेत.
dangerous Stunt with 2 pillion rider one in front & one at rear,
no helmet & doing whilly !they know that Mumbai roads hv became #PotholesFree now…!
pls catch him @MTPHereToHelp
bike reg no. is Mh01DH5987 pic.twitter.com/tvYeRMDR39
— @PotholeWarriors Foundation💙 #RoadSafety🇮🇳🛵🛣 (@PotholeWarriors) March 30, 2023
बाइकवर बसलेल्या मुली हातवारे करताना दिसत आहेत, हसत आहेत. तसेच बाइकवर बसलेल्या तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेलं नाही. @PotholeWarriors या ट्विटर हँडलवरून या स्टंटबाजीचा व्हिजीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १.७३ लाख लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्वीट करत, ‘वांद्रे-कुल्रा संकुल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणाला या व्हिडीओमधील व्यक्तींची माहिती असेल, तर तुम्ही आम्हाला थेट मेसेज करू शकता, असे म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम २७९ आणि कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.