Three-star Grand Prix event 2024 – भारताच्या श्रुती व्होरा हिने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. स्लोव्हेनियातील लिपिका येथे खेळल्या गेलेल्या अश्वारोहण स्पर्धेतील तीन तारांकित(थ्री स्टार) ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकण्याची किमया तिने साधली आहे. यासह हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय घोडेस्वार ठरली आहे. श्रुतीने चमकदार कामगिरी करताना मोल्दोव्हाच्या तातियाना अँटोनेन्को आणि ऑस्ट्रियाच्या ज्युलियन गेरिचला मागे टाकले.
श्रुती ६७.७६१ गुणांसह या स्पर्धेत अव्वल स्थानावर राहिली. तर तातियानाने 66.522 गुणांसह दुसरे तर ज्युलियनने ६६.०८७ गुणांसह या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. मूळ कोलकाता येथील श्रुतीने यापूर्वी ड्रेसेज वर्ल्ड चॅम्पियनशिप (2022) आणि आशियाई खेळ (2010, 2014) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
विजेतेपदानंतर श्रुती म्हणाली की, मी या निकालाने खूप खूश आहे. मी कठोर परिश्रम केले आहेत आणि जिंकणे खरोखरच समाधानकारक आहे. हा विजय पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर मिळाल्याने अत्यंत महत्त्वाचा आहे. यासह, ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरल्याचाही अतिव आनंद आहे. यापूढेही भारताला सन्मान मिळवून देण्यासाठी मी कठोर परिश्रम करत राहीन.
T20 World Cup 2024 : भारत-कॅनडा आज आमने-सामने; सामन्यावर पावसाचे सावट…
श्रुतीचा विजय महिलांसाठी प्रेरणादायी…
भारतीय घोडेस्वार महासंघाचे सरचिटणीस कर्नल जयवीर सिंग यांनी श्रुती व्होराच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ते यावेळी म्हणाले की, भारतीय घोडेस्वारी समुदायासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. श्रुतीच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे या दुर्लेभ क्रीडाप्रकारात नक्कीच देशाचा मान वाढला आहे. तसेच, श्रुतीच्या विजयामुळे, अश्वारोहनासाख्या भारतात दुर्लेक्षित असणाऱ्या खेळात अनेक महिला सहभागी होताना दिसतील. तिच्या विजयामुळे महिलांना प्रेरणा मिळणार असून, आता आगामी ऑलिंम्पिक स्पर्धेत श्रुतीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.