नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ माजली आहे. दहशतवाद्यांच्या धमकीमुळे अयोध्या प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्यानंतर अयोध्या अलर्ट मोडवर आलं आहे. राम मंदिरासह महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरकेतषा वाढव करण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळाचीही सुरक्षा वाढवण्यात आली, एसएसपी राज करण नय्यर यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
त्यांनी अयोध्या राम मंदिरातील सुरक्षेचाही आढावा घेतला. अयोध्येच्या सुरक्षेबाबत एसएसपी राज करण नय्यर म्हणाले की, अयोध्या धामची सुरक्षा व्यवस्था वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे आणि सुरक्षेसाठी पथके तयार केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विविध झोनमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त पीएसीच्या अनेक कंपन्याही आल्या आहेत, पीएसी तैनात करून सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. संरक्षित, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर पोलिस नजर ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.