पुणे – 14 जून 2024 जागतिक रक्तदाता दिनानिमित्त, टेम्पेस्ट ॲडव्हर्टायझिंगने आपल्या हैदराबाद, बंगलोर व पुणे येथील शाखांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले. या तिन्ही महानगरांमध्ये अनेक स्वयंसेवक स्वेच्छेने या उदात्त कार्यासाठी पुढे आले आणि रक्तदान शिबिर यशस्वी झाले.
हैदराबादमध्ये रोटरी क्लब ऑफ हैदराबाद डेक्कन आणि साई सागर हाइट्स रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन यांनी संयुक्तपणे ही रक्तदान मोहीम राबविली.
साई सागर हाइट्स, प्रकाश नगर, बेगमपेठ येथे आयोजित केलेल्या या शिबिराला रहिवासी, विविध कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसह अनेक संस्थांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. टेम्पेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही अभिमानाने समाजासाठी आपले सक्रिय योगदान दिले.
“भारतात दर 2 सेकंदाला एका रुग्णाला रक्ताची गरज असते. शिवाय, शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार आणि शारीरिक इजेमुळे रक्तसंक्रमणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदानाचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीला देण्याची रक्त ही सर्वात मौल्यवान भेट आहे,” रोटरी छल्ला ब्लड सेंटरच्या ऑपरेशन हेड अर्चना पांडा म्हणाल्या
“विविध क्षेत्रांमध्ये ब्रँडिंग आणि ग्राहक-केंद्रिततेला प्रोत्साहन देतानाच, आम्ही रक्तदानासारख्या चांगल्या कृतींनाही प्रोत्साहन देत आहोत, याचा अभिमान वाटतो. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद, मोठा सहभाग आणि सहभागी व्यक्तीची जीवदानाबद्दलची आस्था बघून अतिशय आनंद झाला,” असे तुराब लकडावाला, मॅनेजिंग डायरेक्टर, टेम्पेस्ट ॲडव्हर्टायझिंग, यांनी सांगितले
या रक्तदान मोहिमेमुळे टेम्पेस्टचे कर्मचारी आणि सहकारी स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना दृढ झाली. या उपक्रमाद्वारे समाजात बदल घडविणे- मेकिंग अ डिफरन्स (GO MAD) या टेम्पेस्टच्या मूलभूत संकल्पनेत मोलाची भर घातली