पुणे – पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसात भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते. काल 1 एप्रिल रोजी मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे हे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मुळीक यांच्यावर टीका केली होती. आता मुळीक यांनी देखील आव्हाड यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
जगदीश मुळीक यांनी ट्वीट करत लिहिले की, “बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली. या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. फेकन्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत! प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे.’ यासोबत त्यांनी एक बॅनरचा फोटो देखील शेअर केला आहे.
बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली
या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही.
फेकन्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत!प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे pic.twitter.com/2VXKRsQc4W— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) April 1, 2023
या बॅनरमध्ये त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेला निवेदन केले आहे. ‘माझ्या वाढदिवसादिनी 1 एप्रिल रोजी दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता. विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे 1 एप्रिल रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी याची नोंद घ्यावी. वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले आहेत,’ असे या पोस्टरमध्ये जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.
१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार pic.twitter.com/NKLw3l7wVy
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर टीका करत ट्वीट केले होते. ‘दहा दिवसांचे सुतक तर संपु द्या मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात… आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार…’, असे आव्हाड यांनी म्हंटले होते.