राहाता, (प्रतिनिधी)- येथील डॉ. मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे महिला दिनानिमित्त महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना प्रोटीन डबा व साडी वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याची परंपरा डॉ. मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे प्रत्येक वर्षी सातत्याने सुरूआहे.
यावर्षी ८ मार्च महिला दिनी शेकडो महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना प्रोटीन डबा व साडी वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.पी.जी.गुंजाळ, मुख्याधिकारी सुनील लोंढे, डॉ.संतोष मैड, डॉ. शुभांगी घोगरे, डॉ.आशुतोष मैड, डॉ.यशोधन पितांबरे, डॉ धर्मवीर सहाणे , डॉ. स्नेहल कोठारी, डॉ . शिवानी मैड, ज्योती मैड, डॉ, दिपाली ठोंबरे, राजू पठाण,दशरथ तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ संतोष मैड म्हणाले, शासनाच्या जननी आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत येथे प्रसूती होणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात शासनाकडून मिळणारी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. उपचारांबरोबरच शस्त्रक्रिया करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.डॉ. गुंजाळ म्हणाले महिला आपला आजार लवकर सांगत नाही.
त्या अंगावर दुखणे काढतात तसे न करता त्यांनी तत्काळ उपचार घ्यावा. महिला पुरुषांपेक्षा जास्त काम करतात. त्यांना चांगल्या आहाराची गरज आहे. डॉ.आशुतोष मैड यांनी महिलांना कॅन्सरबाबत होणाऱ्या समस्यांवर काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती देऊन हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या विविध आरोग्य विभागाबाबत माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास बोऱ्हाडे, मंदार कुलकर्णी, निखिल खर्डे, शार्दुल बोऱ्हाडे ,शुभम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सुधाकर पाटील, संजय कार्ले, संदेश गायकवाड, असिफ मन्सुरी, अतिफ मन्सुरी ,तैयमुर इनामदार,विष्णू सांभारे,ईश्वर मोरे,ईश्वर गोडगे,अनुराग बनसोडे तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.