नवी दिल्ली – मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी यांनी पुढील निवडणुकांच्या मुद्यावर मोठे वक्तव्य केले आहे. जर मला पुढील निवडणूक लढवायची असेल तर ती मथुरेतूनच लढणार आहे, इतर कोणत्याही ठिकाणाहून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुढील निवडणूक मथुरेतूनच लढणार असे सांगितले आहे. इतर कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. असेही त्यानं म्हणाल्या आहे.
दुसरीकडे तिसर्यांदा निवडणूक लढवण्याच्या प्लॅनबद्दल हेमा मालिनी यांना विचारले असता त्या म्हणाला,’जर पक्षाला वाटत असेल की मी निवडणूक लढावी तर मला काही अडचण नाही. मथुरेतून लढणार असल्याचा वक्तव्यावर सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की,’मला भगवान कृष्ण आणि त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम आहे, तसेच त्यांची सेवा करायची आहे. गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामाच्या बळावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येतील, असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केला.’
दरम्यान, हेमा मालिनी यांनी भाजपच्या तिकिटावर 2014 आणि 2019 मध्ये मथुरा लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी आरएलडी नेते जयंत चौधरी यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 2003 ते 2009 या काळात त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. 2014 च्या निवडणुकीत, भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह यूपीमध्ये एकूण 80 जागांपैकी 73 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने दोन आणि समाजवादी पक्षाने पाच जागा जिंकल्या. 2014 मध्ये आरएलडी दुसऱ्या, बसपा तिसऱ्या आणि सपा चौथ्या स्थानावर होती.