सायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन

नवी दिल्ली – सुरक्षित आणि निर्धोक डिजिटल पेमेंट व्यवस्था प्रदान करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर फसवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन 155260 आणि तक्रार मंच कार्यान्वित केला.

राष्ट्रीय हेल्पलाइन आणि तक्रार मंच, फसवणूक झालेल्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाच्या पैशाचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने अशा घटनांची नोंद करण्यासाठी एक यंत्रणा उपलब्ध करुन देतो. 01 एप्रिल 2021 रोजी ही हेल्पलाइन प्रायोगिक स्तरावर सुरु करण्यात आली.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (आय 4 सी) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय), सर्व प्रमुख बॅंका, पेमेंट बॅंका, वॉलेट्‌स आणि ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सक्रिय पाठिंब्याने आणि सहकार्याने ही हेल्पलाइन 155260 आणि तक्रार मंच कार्यान्वित केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.