वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथे हवेली तालुका भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील व ग्रामपंचायत सदस्या सुनिता अनिल सातव पाटील या दाम्पत्याने नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उपक्रम राबवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या दोन वर्षापासून वाघोली गावचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यानंतर वाघोलीतील समस्या पुणे मनपाच्या तसेच वैयक्तिक रित्या सोडवण्यासाठी अनेक स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून वैयक्तिक व पुणे महानगरपालिका प्रशासन व इतर यांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनिल सातव पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ पुणे जिल्हा भाजप नेते प्रदीप कंद यांच्या उपस्थित करण्यात आला होता. अंतर्गत रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन तसेच इतर सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी साधलेला संपर्क व त्यास तातडीने प्रश्नांची सोडवणूक करून नागरिकांना देण्यात येणारा दिलासा यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या २ वर्षांपासून हेल्पलाईन नंबर सोशल मीडिया हँडल्स तसेच वैयक्तिक भेटीद्वारे वाघोलीमधील नागरिकांनी नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांचा जलदगतीने निपटारा केलेला आहे. या समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका, PMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. तसेच शक्य असेल त्याठिकाणी वैयक्तिक पातळीवर स्वखर्चातून सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावलेला आहे.
-अनिल सातव पाटील अध्यक्ष- भाजपा युवा मोर्चा, हवेली तालुका.