पॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार

नवी दिल्ली – पॉवर ग्रिड कंपनीने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर केला आहे. या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 40,824 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून कर वजा जाता 12,036 कोटी रुपयांचा एकत्रित नफा मिळवला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये या कंपनीच्या उत्पन्नात 6 % तर नफ्यात 9% ची वाढ झाली आहे.

2020-21 मध्ये कंपनीला 11,284 रुपयांचा भांडवली खर्च आला आणि कंपनीकडे 21,467 कोटी रुपयांची एकत्रित भांडवली मालमत्ता होती. पॉवरग्रिडच्या एकूण स्थावर मालमत्तेचे एकत्रित मूल्य 31 मार्च 2021 रोजी 2,41,498 कोटी इतके होते. मार्च 2020 मध्ये हे मूल्य 2,27,543 कोटी इतके होते.

पहिल्यांदाच, पॉवरग्रिड बोर्डाने कंपनीचे सामाईक समभाग, आपल्या समभागधारकांना 1:3 गुणोत्तराने बोनस समभाग म्हणून दिले आहेत. कंपनीने 30% (10 रुपये किमतीच्या समभागावर 3 रुपये) चा अंतिम लाभांश देण्याचा प्रस्तावही मांडला आहे.

हा लाभांश पहिल्या आणि दुसऱ्या सरासरी 90 टक्के लाभांशांच्या व्यतिरिक्त देण्याचा प्रस्ताव आहे, आधीचे दोन्ही लाभांश 2020-21 मध्ये देण्यात आले आहेत. म्हणजेच वर्षाचा एकूण लाभांश प्रति समभाग 12 रुपये इतका असेल. गेल्यावर्षी तो प्रति समभाग 10 रुपये इतका होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.