पिंपरी-चिंचवड : कोविड रुग्णांसाठी तीन हेल्पलाइन जाहीर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोविड रुग्णांकरिता तीन हेल्पलाइन जाहीर करण्यात आल्या आहेत. बाधितांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याकरिता प्रत्येक हेल्पलाइनला दहा कनेक्‍शन्स उपलबध करुन दिले आहेत. एकूण तीस कनेक्‍शन्स आता कोविड बाधितांसाठी उपलब्ध असणार आहेत.

शहरात दररोज अडीच हजारांपेक्षा अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरातील महपालिका व खासगी रुग्णालयांमधील बेड, ऑक्‍सिजन व व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त होत आहेत.

तर रुग्णालयात उपलब्ध असलेली बेडसंख्या जाणून घेण्याकरिता हॉस्पिटल बेड मॅनेजमेंट हेल्पलाइन, होम आयसोलेशनमध्ये असलेले कोविड बाधितांसाठी स्वास्थ्य हेल्पलाइन व व बाधितांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्‍टर्स हेल्पलाइन उपलब्ध करुन दिल्या आहेत.

यामध्ये हॉस्पिटल बेड मॅनेजमेंटची माहिती 020-67331151आणि 67331152 या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. तर डॉक्‍टरांशी संपर्क साधण्यासाठी 020 67331141 आणि 67331142 हे दोन क्रमांक उपलब्ध आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.