मांजरी खुर्द (प्रतिनिधी) – कोलवडी ( ता.हवेली ) येथील हवेली तालुका तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विकास सूर्यकांत गायकवाड पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील गरजूंना किराणा साहित्य व भाजीपाल्याचे घरपोच वाटप केले आहे.
योग्य खबरदारी घेत त्यांचे सहकारी अमर गायकवाड, सचिन गायकवाड, रमेश मदने, अजित गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विनायक गायकवाड, समीर खेडेकर, संजयकुमार दीक्षित यांनी या साहित्याचे वाटप केले आहे. गहू, तांदूळ, साखर, तेल,मीठ,रवा,मसाले, बिस्किटे असा किराणा व भाजीपाला असे किट तयार करून दोघे दोघे मिळून गरजू असलेल्या कुटुंबांना त्यांनी वाटप केले आहे.
सध्या शेकडो कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले असून आवश्यक वाटल्यास पुन्हा एकदा गरजूंना या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विकास गायकवाड यांनी सांगितले. असा संकट समयी आपणही कोणाच्या मदतीला धावून आले पाहिजे ही सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सहकार्याच्या मदतीने राबविला जात असल्याचे ही गायकवाड यांनी सांगितले.