नगर – लॉकडाऊनमुळे श्रीरामपूर येथील हातावर पोट असलेल्या गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली असताना चर्मकार विकास संघ व लोकनेते आमदार सीतारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गटई कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने 75 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. चर्मकार विकास संघ व लोकनेते आमदार सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे व मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांच्या पुढाकाराने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून हातावर पोट असलेल्या गटई कामगारांसह मोलमजुरी करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन आधार देण्यात आला.