वाघोली – आव्हाळवाडी तालुका हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून आव्हाळवाडी येथील स्नेहालय या मतिमंद मुलांच्या शाळेला भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, अक्षदा आव्हाळे, संजय आव्हाळे, अनिल आव्हाळे,अजित आव्हाळे व स्नेहालय संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ आव्हाळे यांनी स्नेहालय मधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा प्रश्न तातडीने सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.