वाघोली( प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेकडून मुद्रांक शुल्क महसुलावर आधारित वाघोली ग्रामपंचायतीस ६ कोटी ९८ लाख ७२ हजार ५५० रूपये तसेच आव्हाळवाडीला २ कोटी ३३ लाख ६१ हजार ५२८ हजार रूपये वर्ग करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली.
रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की जिल्हा परिषदेकडून वाघोली आणि आव्हाळवाडी या ग्रामपंचायतीसह लोणीकंद २ कोटी ६५ लाख, बकोरी ९ लाख 16 हजार, वाडेबोल्हाई ८ लाख ५० हजार, शिरसवडी ५ लाख ९८ हजार, फुलगाव १ लाख ५० हजार, तुळापूर ७४ हजार , भावडी ७४ हजार यानुसार निधी वर्ग करण्यात आला आहे.
शासनाकडून राज्यातील जिल्हा परिषदांना मुद्रांक शुल्क निधी लवकरात लवकर ग्रामपंचायतींना मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता आता त्याला यश मिळाले आहे. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार,हवेली पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे दाभाडे यांनी सांगितले.