नवी दिल्ली- मागील अनेक महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत. कर्नाटक, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरातनंतर आता यूपीमध्येही दगडफेकीची घटना समोर आली आहे.
ही ट्रेन गोरखपूरहून लखनऊला जात होती. त्यादरम्यान, काही अज्ञातांकडून ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ट्रेनमधील 4 खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यामध्ये एकाही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.
यूपीआधी गुजरात, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू अनेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन सुर झाल्यानंतर अशा घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्येही अनेक राज्यांतून संशयित आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
गोरखपूरहून लखनऊला जाणाऱ्या वंदे भारत (ट्रेन क्रमांक 22549)वर काही अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये अनेक खिडक्यांच्या काच्या फुटल्या.
दगडफेकीमुळे कोच क्रमांक सी-1, सी-3 आणि एक्झिक्युटिव्ह कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. ट्रेनवर झालेल्या दगडफेकीमुळे अनेक प्रवासी घाबरले आणि एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने यामध्ये प्रवाशांना दुखापत झालेली नाही.